मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात आतंकवादी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडणार्या संजय गोविलकर (Sanjay Govilkar) यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे (Mumbai Police Commissioner Sanjay Barve) संजय गोविलकर आणि जितेंद्र सिंगोट (Jeetendra Shingote) यांना निलंबित केलं आहे. या दोन्ही पोलिस ऑफिसर्सवर दाऊदचा साथीदार सोहेल भामला (Sohail Bhamla) यांना सोडून दिल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. मुंबई: दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिजवान कासकर ला खंडणी विरोधी पथकाकडून अटक
सोहेल याच्या विरोधात लूक आऊट नोटीस देण्यात आली होती. दुबईहून मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती. EOW मध्ये कार्यरत असणार्या दोन ऑफिसर्सनी एका जुन्या प्रकरणामध्ये सोहेलला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली पण त्यानंतर त्याला सोडून दिले. त्यामुळे कामामध्ये बेजबाबदारपणा केल्याच्या आरोपाखाली पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दोघांना निलंबित केलं आहे.
संजय गोविलकर यांनी 26/11 च्या रात्री गिरगाव चौपाटीवर शहीद पोलिस कॉस्टेबल तुकाराम ओंबाळे यांच्यासोबत होते. कसाब आणि इस्माईल यांची गाडी रोखून कसाबला पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. इस्माईलवर त्यांनी गोळीबारदेखील केला होता. या चकमकीत ओंबळे शहीद झाले होते.