अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा पुतण्या रिजवान कासकर (Rizwan Kaskar) याला देश सोडून पळून जाताना मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाकडून मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांच च्या खंडणी विरोधी पथकाकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एक मोठं यश मानलं जात आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, छोटा शकीलचा सहकारी अफरोज वदारिया देखील मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. रिजवान हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे.
इकबाल कासकर देखील खंडणीच्या गुन्ह्यात सध्या अटकेत असून कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊदचा सहकारी रियाज भाटीला अटक करण्यात आली होती. त्याने विल्सन कॉलेजची बनावट पत्र बनवली होती.
ANI Tweet
Mumbai Police Anti-Extortion Cell arrested Dawood Ibrahim's brother, Iqbal Kaskar's son Rizwan from Mumbai airport, last night. pic.twitter.com/Fc3YFYNYVY
— ANI (@ANI) July 18, 2019
Mumbai: Rizwan, son of Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar, has been sent to Police custody till 22nd July. https://t.co/p6gZ2rnFOH
— ANI (@ANI) July 18, 2019
पाकिस्तानने दाऊद इब्राहिम त्यांच्याकडे नसल्याचा दावा वारंवार केला आहे. मात्र तो फोल ठरला आहे. छोटा शकीलचा सहकारी अफरोज वदारिया यालादेखील मुंबई पोलिसांनी हवाला प्रकरणी अटक केली होती.