मुंबई पोलिसांनी साजरा केला एकट्या राहणार्‍या ललिता सुब्रमण्यम यांचा 85 वा वाढदिवस
Lalita Subramanyams Birthday Celebration (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिस (Mumbai Police) समाजासाठी करत असलेल्या अनेक लहानसहान गोष्टींसाठी सतत चर्चेमध्ये असते. अनेकदा पोलिसांचं नाव सांगून भीती दाखवली जाते पण माटुंगा पोलिस स्टेशन (Matunga Police Station) मागील चार वर्ष दरवर्षी 2 जानेवारी दिवशी करत असलेल्या एका खास गोष्टीमुळे अनेकांना माटुंगा स्टेशनच्या पोलिसांचा अभिमान वाटेल.

माटुंगा पोलिस स्टेशन दरवर्षी 2 जानेवारी दिवशी ललिता सुब्रमण्यम (Lalita Subramanyam)या मुंबईत एकटया राहणार्‍या महिलेचा वाढदिवस साजरा करतात. यंदा ललिता सुब्रमण्यम यांचा 85 वा वाढदिवस पोलिसांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. यावेळेस डेप्युटी कमिशनर एन. अंबिकादेखील उपस्थित होत्या.

‘senior citizens requiring care and protection’ या उपक्रमाखाली ललिता सुब्रमण्यम यांचे नाव रजिस्टर आहे. माटुंगा पोलिस स्टेशन ललितांना बॅंकेचे व्यवहार, दैनंदिन दिवसात आवश्यक सामग्री, औषध आणून देण्यासही मदत करतात. ललितांचा पहिला वाढदिवस 2016 साली साजरा झाला. ललिता यांची दोन मुलं अमेरिकेत आणि एक बंगळूरूमध्ये राहतात.