मुंबई मध्ये होळीच्या निमित्ताने वाहतुक आणि मुंबई पोलिस गुरुवारी रस्त्यांवर दिसून आले. कारण होळीच्या निमित्ताने अनेक जण दारु पिऊन गाडी चालवून दुर्घटना होण्याचे बरेच प्रकार घडतात. त्यामुळे गुरुवारी होळीनिमित्त खास मुंबई पोलिस आणि वाहतुक शाखेने मुंबईच्या रस्त्यांवर बंदोबस्त देत जवळजवळ 10,675 जणांवर वाहतुकीचे नियम मोडल्याबंद्दल कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान 16 तासामध्ये मध्ये दारु पिऊन गाडी चालवणारे एकूण 725 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केल्या आहेत. तसेच 789 पोलिसांनी दुचाकीच्या पाठी दारु प्यायलेले आणि 166 जणांना नियामांचे पालन न करता गाडी चालवल्याने अटक केली आहे. तर 430 जणांना गाडी वेगाने चालवत असल्याप्रकरणी पकडले आहे. त्याचसोबत 4738 जणांनी हेल्मेट न वापरता वाहन चालवणे आणि 3827 जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी होळीच्या मध्यरात्रीपासूनच बंदोबस्त देण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये दारु पिऊन गाडी चालवणे, ट्रिपल सीट, हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.