Delhi Violence: दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराचा मुंबईकरांनी रस्त्यावर उतरत नोंदवला निषेध
Mumbaikar protest against the Delhi Violence (Photo Credit: ANI)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendenment Act) यावरुन सुरु असलेल्या वादावरुन दिल्ली (Delhi) मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. सीएए (CAA) समर्थक आणि समर्थक यांच्यात पुन्हा भडका उडला त्यामुळे दिल्लीत काल (24 फेब्रुवारी) तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाली होती. या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशावर उमटले असून मुंबईत लोकांनी रस्त्यावर उतरत त्याचा निषेध केला आहे. मुंबईतील (Mumbai) मरिन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात मुंबईकर हातात मेणबत्ता घेत एकत्र जमले आणि त्यांनी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल निषेध व्यक्त केला.

या हिंसाचाराला रोखण्याचा प्रयत्न करण्याऱ्या एका पोलिसाचा मृत्यू झाला तर यात 37 पोलिस जखमी झाले आहेत. 50 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती हाती येत आहे. या जखमींवर दिल्लीच्या गुरु तेग बहादुर आणि मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या हिंसाचारात 4 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसंच वित्तहानी देखील झाली आहे. (CAA Protest: दिल्लीतील गोकुलपुरी येथे गोळीबारात 1 हेड कॉन्स्टेबल ठार, डीसीपी जखमी; अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे मदतीची मागणी)

ANI Tweet:

हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असला तरी कोणतीही एफआयआर दाखल न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून कालच ते भारतात दाखल झाले. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच हा हिंसाचार करण्यात आला आहे का? असा संशयही व्यक्त केला जात आहे.