Mumbai manja Accident- PC Source

Mumbai News:  मुंबईतील बोरिवली येथे रविवारी दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मांजाने मान कापल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  मोहम्मद सैप इस्राईल फारूक असं मांजाने गळा कापलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण धारावी येथील रहिवासी असून तो एसी मेकॅनिक होता. दुपारच्या दरम्यान 3.15 घरी परतत असताना सुमेर नगरजवळील बोरिवली पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर ही घटना घडली. ( हेही वाचा- मुंबईत नायलॉनच्या मांजामुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गळा; थोडक्यात बचावले)

 तरुणाचा गळ्यात मांजा अडकला

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा त्याचा मित्र हमीद अनीस अहमद याच्यासोबत चारकोर येथे एसी दुरुस्तीच्या कामासाठी गेला होता. परतत असताना मोहम्मद बाईक चालवत होता. हेल्मेच घालून तो बाईक चालत होता. पश्चिम द्रुतगती चालवत महामार्गावर जाताना सुमेर नगर उड्डाणपुलावर पोहोचला. अचानक त्याच्या गळ्यात पतंगाचा नायलॉनचा मांजा अडकला आणि पुढे जाईन तो पडला. त्याच्या गळातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर त्याच्या मित्राने लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले.

सुरुवातीला त्याच्या मित्राला या संदर्भात काहीच कल्पना आली नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु केला, उपचारानंतर अवघ्या १५ मिनीटानंतर त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मदचा मृत्यू मांजाने गळा कापल्याने झाला असल्याचा डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मोहम्मदच्या कुटुंबियांना देण्यात आली.

महिलेची हनुवटी कापली

काल दुपारी ३ वाजता विलेपार्ल उड्डणपुलावर दुचाकीवरून जात असताना एका महिलेचा मांजाने हनुवटी कापली गेली. शिल्पा महाडिक (39) असं या पीडित महिलेचे नाव आहे. तिने हेल्मेट आणि स्कार्फ घातल्यामुळेच तीचा जीव वाचला गेला. वाकोला वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा यांना सांताक्रुझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल केले.  महिला तिच्या आईला भेटण्यासाठी वांद्रा येथे जात होत्या. दरम्यान ही घटना घडली. व्हीएन देसाई रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. महिलेचा थोडक्यात जीव वाचला.  वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विमानतळासमोरील विलेपार्ले उड्डाणपुलावर ही घटना घडली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केले.