Mumbai Local Train | (File Image)

Central Railway: लोकला मुंबईची लाईफलाईन म्हणतात. लोकलने रोज लाखो लोक विनातिकीट प्रवास(Passengers Without Ticket) करतात. लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांना(Passengers)आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) कंबर कसून मोठी कारवाई केली. यात फक्त दोन महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल 63 कोटींचा दंड (Fine)वसूल केला आहे. समोर आलेला हा आकडा एप्रिल आणि मे 2024 महिन्यातला आहे. (हेही वाचा:Western Railway Ticket Checking Drive: विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेची कारवाई; एप्रिल 2024 मध्ये तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान वसूल केला 20 कोटींहून अधिक दंड )

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर तसचं प्लॅटफॉर्मवर विशेष तिकीट तपासणी मोहिम सुरू असते. मागील दोन महिन्यात रेल्वेच्या टीसींनी 9 लाख फुकटे प्रवासी पकडले आणि त्यांच्याकडून तब्बल 63 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये जनरलचे तिकीट काढून स्लीपर किंवा एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांचा यात मोठा समावेश आहे. तर, 4.07 लाख प्रवासी एकट्या मुंबई विभागातील आहेत. त्यांच्याकडून जवळपास 25.01 कोटी रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. भुसावळ विभागात 1.93 लाख विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर विभागाचून 1.19 लाख, सोलापूर विभागातून 54.07 हजार आणि पुणे विभागातून 83.10 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.