Mumbai Missing Girls Case: 21 पैकी 8 अल्पवयीन मुली बेपत्ता होऊनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई नाही; किरीट सोमय्या यांची राज्य सरकारच्या कामकाजावर टीका
Kirit Somaiya Visited Govandi Police on Young Girls GAYAB Case (Photo Credits: ANI)

मुंबईतील गोवंडी येथून फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण 21 मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात 8 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारला ट्विटच्या माध्यमातून सवाल केला आहे. शहरात 21 मुली बेपत्ता होऊनही केवळ 6 जणींच्या तक्रारीची नोंद पोलिस स्थानकांत करण्यात आली आहे. हा फरक का? तसंच 21 पैकी 8 मुली या 14 ते 17 वयोगटातील असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई  करण्यात आलेली नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "गोवंडी येथून 21 मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानंतर गोवंडी पोलिस स्टेशनला भेट दिली. मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये 2, देवनार पोलिस स्टेशनमध्ये 4, शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये 0 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. ही सर्व पोलिस स्टेशन्स लागूनच आहेत. तरी देखील इतका फरक का? यापैकी 8 मुली या 14 ते 17 वयोगटातील असूनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही."

Kirit Somaiya Tweet:

दरम्यान या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लव्ह जिहादचा कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचे नाकारले आहे. बेपत्ता झालेल्या मुलींपैकी 17 मुलींना शोधून काढले असून 4 मुलींच्या शोधासाठी तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्ते एस. चैतन्य यांनी दिली आहे.