Mumbai Metro : मुंबईत मेट्रो सुरु झाल्यापासून मेट्रोला प्रवाशांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, आजूनही मुंबईकरांना मेट्रोच्या (Mumbai Metro ) वेगवेगळ्या मार्गीकांचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागत आहे. आता मेट्रोच्या सर्व मार्गांचे एक तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या मुंबईत मेट्रो १ शिवाय मेट्रो २ अ व मेट्रो ७ (गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर) या मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. मोठया संख्येने मुंबईकर प्रवास करत आहेत. मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका एमएमआरडीएकडे असल्याने त्या मार्गाचे संयुक्त तिकीट (Metro Ticket) काढता येते. परंतू मेट्रो १ मार्गिकेसाठी वेगळे तिकीट काढावे लागत होते. आता मात्र सर्व मार्गांचे एकच तिकीट मिळणार आहे. (हेही वाचा :Navi Mumbai Metro: जवळजवळ 68,000 हून अधिक प्रवाशांनी केला नवी मुंबई मेट्रोने प्रवास; केवळ 5 दिवसांत वाहतूक समस्या झाली कमी)
मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका गुंदवली व अंधेरी पश्चिम या स्थानकाजवळ संलग्न होतात. मात्र तसे असतानादेखील मेट्रो १ चे तिकीट स्वतंत्र काढावे लागते होते. कारण, मोट्रो १ ही राज्य सरकारच्या ताब्यात होती. आता ही मार्गिका एमएमआरडीएकडे आल्यानंतर घाटकोपर-वर्सोवा (Ghatkopar-Versova Metro )व गुंदवली ते अंधेरी पश्चिम या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांचे एकत्रित तिकीट प्रवाशांना काढता येईल. ही मार्गिका खरेदी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे.