
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी आता Mumbai Metro Line 3 कडे सारेच आशेने पाहत आहेत. Aqua Line, म्हणून ही मेट्रो सेवा लवकरच Bandra-Kurla Complex (BKC) ते Acharya Atre Chowk Worli पर्यंत धावणार आहे. सध्या या मेट्रोचं लोकार्पण करण्यापूर्वीची काही शेवटची कामं, आवश्यक परवानग्या घेतल्या जात आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये Managing Director of Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL) अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो लवकरच सुरू होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) कडून मंजुरीची सध्या प्रतिक्षा आहे. यानंतर मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे. Mumbai Metro Line 3 Trial Runs: धारावी ते आचार्य अत्रे चौक या मुंबई मेट्रो अॅक्वा लाइन 3 ची ट्रायल रन सुरू, येथे पाहा व्हिडीओ .
कधी सुरू होणार मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा
मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकं
मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे. Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य.
मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्यात 12.44 किमी लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 10 स्थानकांचा समावेश आहे. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 पर्यंत दररोज 96 फेऱ्या चालवल्या जात आहेत. यामध्ये आरे ते बीकेसी हा रस्ता मार्गे तासाभराचा प्रवास मेट्रोने फक्त 30 मिनिटांपर्यंत आला आहे. या मार्गावरील तिकिटांचे दर 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहेत.