मुंबईच्या मध्य (Central), पश्चिम (Western) आणि हार्बर (Harbour) या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामामुळे मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. तीनही रेल्वे मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.25 पर्यंत हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान तीनही रेल्वे लाईनच्या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. प्रवाशांनी त्यानुसार आपला प्रवासाचे नियोजन करावे आणि मध्य रेल्वेला सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.25 दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही धिम्या मार्गावरून जलद मार्गाकडे वळविण्यात आल्या आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते माटुंगा धीम्या मार्गासह मानखुर्द आणि नेरुळ मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यना मेगाब्लॉक ठेवण्यातआला आहे.
पाहा कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक:
मध्य रेल्वे
सीएसएमटी ते माटुंगा दरम्यान सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार
हार्बर रेल्वे
मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यादरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी बेलापूर लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेगाब्लॉक प्रवाशांना होणा-या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आपल्यास सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.