कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी रेल्वे सेवा ही सामान्य नागरिकांसाठी जरी बंद असली तरी अत्यावश्यक सेवेत काम करणा-या लोकांसाठी ती काही अंशी सुरु आहे. त्यामुळे रेल्वे मार्गांवरील दुरुस्तीच्या कामासाठी येत्या रविवारी म्हणजेच 20 सप्टेंबरला रेल्वेच्या मध्य (Central), हार्बर (Harbour) आणि पश्चिम (Western) या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) ठेवण्यात आला आहे. या दरम्यान मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि विद्याविहार (Vidyavihar) दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या वसई रोड (Vasai Road) ते विरार (Virar) दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना प्रवासादरम्यान काही अडचणी येऊ नयेत यासाठी हे वेळापत्रक अवश्य पाहा.
मध्य रेल्वे
सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील विशेष सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यावर थांबतील. Western Railway Special Suburban Train: मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
पनवेल-वाशी दरम्यान, अप व डाउन मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील. डाउन हार्बर मार्गावर सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत पनवेलकडे जाणार्या विशेष सेवा बंद राहतील. या कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या सीएसएमटी – वाशी विभागात चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे प्रशासनाने रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी वसई रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहेत.