मुंबईच्या महापौर किशोरी (Kishori Pednekar) पेडणेकर यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी सकाळी ग्लोबल रुग्णालयात (Global Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहे. मुंबईत कोणतीही घटना घडल्यास पेडणेकर स्वत: त्या ठिकाणी हजर असतात. कामाची व्यस्तता, सततची धावपळ आणि दगदग यामुळेही त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना रविवारी सकाळी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते. हे देखील वाचा- Mumbai: बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal यांना 'मुंबई रत्न पुरस्कार'; राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान
ट्वीट-
Mumbai Mayor @KishoriPednekar who was admitted in Mumbai's Global hospital following health related issues was discharged today pic.twitter.com/fhsUFF4kn2
— Richa Pinto (@richapintoi) July 20, 2021
महापौर किशोरी पडेणेकर यांनी स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांनी केलेल्या सहकार्याचे मनापासून आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग तज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.