मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) शाहबाज शकील (Shahbaz Shaikh) नावाच्या 26 वर्षीय तरुणास हत्या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावली आहे. शाहबाज याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होता. त्याच्यावर आरोप होता की, त्याने त्याच्या 60 वर्षांच्या आईच्या कथीत प्रियकराची डोक्यात पेवर ब्लॉक घालून वांद्रे टर्मिनस येथे हत्या केली. आपल्या आईचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध असल्याचा शाहबाज याला संशय होता. या संशयातून आणि आईच्या कथीत वर्तनामुळे तो अस्वस्थ होता. त्यातून त्याने तिच्या प्रियकाराची हत्या केली. न्यायालयात त्याच्यावरील सर्व आरोप साक्षी-पुराव्यांनिशी सिद्ध झाले. कोर्टाने सर्व बाजूंचा विचार करुन त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
आरोपीच्या आईने कोर्टात सांगितले की, आपला या हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. याबाबत आपल्यालाही विशेष काही माहिती नाही. आरोपीला ज्याच्यावर संशय होता तो परवेज शेख हा 37 वर्षांचा इस्टेट एजंट होता. त्याला आपण पूर्वी कधीही ओळखत नव्हतो. त्याच्याशी आपला कोणताही संबंध नव्हता. मात्र, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आपण त्याला काही मालमत्ता आणि फ्लॅट दाखविण्यासाठी सोबत घेतले होते. त्याच्यासोबत मालमत्ता पाहायला जात असताना त्याची हत्या झाली. (हेही वाचा, Kanpur Shocker: मांत्रिकाच्या सांगण्यावरून 7 वर्षीय मुलीची हत्या करून यकृत खाल्ल्याप्रकरणी घाटमपूरमध्ये चौघांना जन्मठेपेची शिक्षा)
अधिक माहिती अशी की, धारावी येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये राहणाऱ्या शेख या विद्यार्थ्याला त्याची आई आणि परवेझ यांच्यातील नातेसंबंधांवर संशय होता. त्यामुळे घरात तणाव निर्माण झाला होता. हत्या प्रकरणाचा एक प्रत्यक्षदर्शी असलेल्या झुंबा प्रशिक्षकासह इतर प्रत्यक्षदर्शींनी 21 ऑक्टोबर 2019 च्या घटनेबाबत कोर्टात सांगितले. सक्षीदारांनी सांगितले की, आरोपीने बीकेसी रोडजवळ पीडितेवर हल्ला केला. साक्षीदारांनी आरोपी शेखने पीडित व्यक्तीवर पेव्हर ब्लॉकने केलेल्या अथक हल्ल्याचे तपशीलवार वर्णन केले. हल्ला सुरु असताना जवळच्या लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरीही आरोपीने जुमानले नाही. उलट पीडिताला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांवरच त्याने हल्ला करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, BSP MLA Raju Pal Murder Case: राजू पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद टोळीतील सहा जणांना जन्मठेप, तर एकाला 4 वर्षे कारावासाची शिक्षा)
कोर्टामध्ये साक्ष देताना आणखी एका प्रत्यक्षदर्शी विनय मंडल यांनी सांगितले यांनी की, “भारतीय रिझर्व्ह बँक आणि बीकेसी रोडवरील आयकर कार्यालयादरम्यान, आम्हाला एक व्यक्ती दुसऱ्याला मारहाण करताना आणि एक महिला मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसले. तेथे हल्ला करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला या प्रकरणात ढवळाढवळ करू नका, अन्यथा तो आमच्यावरही हल्ला करेल, अशी धमकी दिली होती.” शेख याने पीडितेच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने सुमारे दहा ते पंधरा वेळा वार केले, असेही मंडल यांनी साक्षीदरम्यान सांगितले.