मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज लोकल मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल (Signal) यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य (Central Railway) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाकडून आजचं सुधारीत लोकलचं वेळापत्रक (Time Table) जारी करण्यात आलं आहे. ते तुम्ही प्रवास करण्यापूर्वी एकदा नक्की तपासा. मुंबई लोकल रेल्वेच्या (Mumbai Local Train) आज मध्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तरी या मेगाब्लॉकची वेळ, बदलेले मार्ग, मेगाब्लॉक कुठल्या स्टेशन पासून कुठल्या स्टेशन पर्यत असेल याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मध्य रेल्वेवरील ठाणे-कल्याण अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक:-
सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ठाणे (Thane) - कल्याण (Kalyan) अप (Up) आणि डाऊन (Down) धीम्या (Slow) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (CSMT) सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा ठाणे (Thane) आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकां दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच सीआरने दिलेल्या माहितीनुसार सर्व लोकल नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा धावतील. (हे ही वाचा:- Pune: कोरोना युद्धात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषद उभारणार स्मारक)
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक:-
सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. वाशी-बेलापूर-पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवाआणि पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवा रद्द राहतील.