Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

मुंबईच्या मध्य (Central), पश्चिम (Western) आणि हार्बर (Harbour) या तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारीला मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. या तीनही मार्गावर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्या कारणाने हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांनी त्यानुसार आपला प्रवासाचे नियोजन करावे आणि मध्य रेल्वेला सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते माटुंगा धीम्या मार्गासह मानखुर्द आणि नेरुळ मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यना मेगाब्लॉक ठेवण्यातआला आहे.

पाहा कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक:

मध्य रेल्वे

सीएसएमटी ते माटुंगा दरम्यान सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. Summer 2020 Special Trains: लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी, सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान मध्य रेल्वे कोकण मार्गावर चालवणार 4 समर स्पेशल ट्रेन्स, इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

हार्बर रेल्वे

मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यादरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी बेलापूर लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार मुंबईकरांना लोकलने प्रवास करावा आणि मध्य रेल्वेला सहकार्य करावे अशी आवाहन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.