कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मार्चमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामध्ये आतापर्यंत शिथिलता आणत आजपासून अनलॉक 6 सुरु झाले. यामध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मुंबईमध्ये लोकल (Mumbai Local) सेवा मोठ्या संख्येने सुरु करण्यात आली आहे. आता आज मध्य रेल्वे (Central Railway) व पश्चिम रेल्वेने (Western Railway) जॉइंट मीडिया अपडेट जारी केला. मुंबई लोकलबाबत राज्य शासनाने 28 ऑक्टोबर 2020 रोजी पत्राद्वारे विचारल्यानुसार रेल्वेने त्यांचे इनपुट्स दिले आहेत. मात्र अजून हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.
मात्र सध्या कोरोनाच्या काळात प्रवाशांची सुरक्षा आणि सामाजिक अंतराची गरज लक्षात घेता रेल्वे उपनगरीय फेऱ्यांची संख्या वाढवित आहे. आज रेल्वेने 2020 फेऱ्या सुरु केल्या होत्या, त्यामध्ये 753 उपनगरीय सेवांची वाढ केली आहे. यासह ही संख्या 2773 वर पोहचली आहे. 2 नोव्हेंबरपासून या नव्या लोकल सुरु होतील. सध्याच्या 1020 मध्य रेल्वेमध्ये अतिरिक्त 552 उपनगरीय सेवांची भर घालून या एकूण 1572 सेवा सुरु केल्या जाणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर 1000 लोकल धावत आहेत. यामध्ये अतिरिक्त 201 उपनगरी सेवा सुरु करून त्यांची संख्या 1201 केली जाणार आहे. (हेही वाचा: महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच कडक कायदा करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा)
Joint media update of CR and WR 👇@RailMinIndia pic.twitter.com/vuSmn9Qwfh
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) November 1, 2020
दरम्यान, रेल्वे प्रवासाबाबत रेल्वेने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेने म्हटले आहे, प्रवाश्यांनी वैद्यकीय आणि सामाजिक कोविड 19 प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे. कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी प्रवाशांना विनंती केली जात आहे की, ट्रेनमध्ये प्रवेश करताना एकाच वेळी गर्दी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी जनतेला विनंती आहे.