Deepak Sathe | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये आज (11 ऑगस्ट) टागोर येथील स्मशान भूमीत एअर इंडियाचे वैमानिक आणि माजी IAF ऑफिसर वैमानिक दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान 7 ऑगस्टला दुबई वरून वंदे भारत मोहिमेअंतर्गत चालवण्यात आलेल्या एअर इंडियाचे विमानाला कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. हे विमान लॅन्ड होताना झालेल्या अपघातात त्याचे दोन तुकडे झाले. विमानाचा एक भाग दरीत कोसळला. यामध्ये मुख्य वैमानिक दीपक साठे आणि को पायलट सह 17 जणांचा मृत्यू झाला.

दीपक साठे हे भारतीय वायुसेनामध्ये कार्यरत होते. दीपक साठे यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर एअरफोर्स अ‍ॅकेडमीत प्रतिष्ठीत मानला जाणार 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' सन्मान मिळवला होता. एअरफोर्समध्ये नोकरी केल्यानंतर दीपक हे एअर इंडियामध्ये व्यावसायिक सेवेत रुजू झाले होते. मिग विमानांसोबतच एअर इंडियाच्या एअरबस310 विमान आणि बोइंग 737 विमानांचे उड्डाण केले होते.

ANI Tweet

दीपक साठे यांनी IX-1344 या दुबई- कोझिकोडे विमानाच्या उड्डाणादरम्यान स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रवाशांचे प्राण वाचवले. महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शासकीय इतमामामध्ये अंतिम निरोप देण्याचा निर्णय घेतला. दीपक साठे यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूरमध्ये त्यांच्या आई-वडीलांच्या भेटीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशनुख स्वतः गेले होते.