मुंबई: सिद्धिविनायक मंदीर उडवण्याची धमकी देणार्‍या केतन घोडके याला अटक
Siddhivinayak Temple (Photo Credits : commons.wikimedia)

मुंबईकरांच्या श्रद्धास्थानांपैकी एक असणार्‍या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदीर उडवण्याची धमकी आज (17 जून) दिवशी विवियाना मॉल मध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही गोष्ट प्रेमप्रकरणाचा एक भाग असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणामध्ये विक्रोळी मधून केतन घोडके (Ketan Ghodke) या तरूणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा सध्या अधिक तपास सुरू आहे.

आज सकाळी विवियाना मॉलमध्ये 'सिद्धिविनियाक मंदिर' उडवणार अशा आशयाचं पत्र सापडलं. या पत्रामध्ये एक मोबाईल क्रमांक दिला होता. तो पोलिसांनी पुढे एटीएसकडे दिला. पोलिसांचा त्या मोबाईल क्रमांकावर एका तरूणीशी संपर्क झाला. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, केतनने सूडाच्या भावनेतून हा प्रकार केला असावा अशी माहिती समोर आली आहे. पुढे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी शालिमार एक्सप्रेसमध्ये अशाच प्रकारे प्रेमप्रकरणातून हल्ला घडवून आणण्याच्या पत्राने खळबळ उडाली होती.