कांदिवली येथे स्कायवॉक उभारणीसाठी तब्बल 66 कोटी रुपयांचा खर्च करणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबईतील (Mumbai) वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी पाहता नागरिकांच्या सोईसाठी स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. मात्र महापालिका (BMC) आणि एमएमआरडीने (MMRDA) उभारलेल्या या स्कायवॉकवर काही वेळेस भिकारी, कपल उभे असल्याचे दिसून येतात. तर रात्रीच्या वेळेस स्कायवॉक वरुन जाणाऱ्या लोकांची संख्या कमी असल्याचे तेथील जागेवर गर्दुल्ले सुद्धा थांबवलेले दिसतात. असा सगळा स्कायवॉकबाबत भोंगळ कारभार असला तरीही आता कांदिवली (Kandivali)  येथे एक नवा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे.

कांदिवली रेल्वेस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयापर्यंत नवी स्कायवॉक नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहे. मात्र या स्कायवॉकसाठी तब्बल 66 कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याची बाब समोर आली आहे. परंतु या स्कायवॉकच्या उभारणीसाठी कोणताही विरोध न करण्यात आलेला नाही.नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉक जवळजवळ 825 मीटर लांब आणि 3.20 मीटर रुंदीचा असणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने अधिक स्पष्टीकरण दिले आहे. कांदिवली रेल्वे स्थानकातून ते शताब्दी रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच हा नवा स्कायवॉक उभारण्यात येण्याचा विचार करण्यात आला आहे.(मुंबई : वांद्रे पूर्व भागातील कलानगर जवळील स्कायवॉक पाडणार)

तसेच मुंबईतील वांद्रे पुर्व विभागातील रेल्वेस्थानक ते कलानगर पर्यंतचा स्कायवॉक या ठिकाणी नागरिकांनी नेहमीच वर्दळ दिसून येते. मात्र येथेही भिकारी, कपल आणि गर्दुल्ल्यांचा वावर असतोच. एवढेच नाही तर पावसाळ्यात स्कायवॉक वरील फरशांचे ही रस्त्यावरील खड्ड्यांसारखे हाल झाल्याच्या तक्रारीन नागरिकांनी केल्या आहेत. त्याचसोबत वांद्रे-वरळी सी लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल अशा उड्डाणपुलाच्या आड येणारा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे स्थानकाबाहेरील स्कायवॉक पाडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्कायवॉकसाठी एमएमआरडीएकडून चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.