Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Case: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे (Sculptor Jaydeep Apte) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आपटे यांना जामीन मंजूर केला. जयदीप आपटे यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांस्य पुतळा पडला असा दावा केला होता. 1 ऑक्टोबर रोजी ओरोस येथील सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आपटे यांनी वकील गणेश सोवानी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला -
प्राप्त माहितीनुसार, 26 ऑगस्ट 2024 रोजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. 28 फूट उंचीचा हा पुतळा 12 फूट उंचीच्या पायथ्याशी 2.44 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला होता. आपटे यांनी 2010 मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकला आणि मॉडेलिंगमध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे. (हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला)
पुतळा पडल्याने कोणीही जखमी नाही -
दरम्यान, आपटे यांचे वकील गणेश सोवानी यांनी युक्तिवाद केला की, पुतळा पडल्याने कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त हा निष्काळजीपणाचा गुन्हा असू शकतो. त्यामुळे पुढील कोठडीची आवश्यकता नाही. तथापी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थानिक पोलिसांकडे एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर आपटे पोलिसांसमोर शरण आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. (हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नट आणि बोल्ट गंजले होते; PWD ने दिलेल्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष, अहवालात समोर आली माहिती)
तथापी, शिल्पकार जयदीप आपटे यांनी सांगितले की, त्यांनी 8 सप्टेंबर 2023 रोजी नेव्हल डॉकयार्डने जारी केलेल्या वर्क ऑर्डरच्या आधारे कांस्य पुतळा बनवला. त्यांच्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, नेव्हल डॉकयार्ड प्राधिकरणाने कधीही कोणत्याही कलात्मक कमतरतेची किंवा उणीवांची तक्रार केली नाही. पुतळा अनेक शतके टिकेल आणि तो चांगल्या स्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय करता आले असते, असंही याचिकेट नमूद करण्यात आलं आहे.