गणेशोत्सवाच्या निम्मीताने मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात. यामुळे दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर याकाळात ट्रफिक जॅम हा होतोच. पंरतू यावर्षी सरकारकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आश्वासन दिले होते की यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास हा सुखमय होईल. पंरतू त्यांचे हे सर्व आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहेत. गणेशोस्तवाला अवघे दोन दिवस राहीले असल्याने मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवा करता कोकणात निघाले असून मुंबई गोवा महामार्गावर गणेशभक्तांचे मेगा हाल होत आहेत. (हेही वाचा - Dhangar Reservation: धनगर आरक्षण मुद्दा तापला, गिरीष महाजन यांच्या शिष्टाई निष्फळ; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली)
मुंबई गोवा महामार्गावर वाहनाच्या मोठ्याच मोठ्या रांगा पहायला मिळत आहे. पनवेल ते इंदापूर हे केवळ दोन तासांचे अंतर पार करायला आठ तासांचा कालावधी लागत आहे. माणगाव, इंदापुर, कोलाड, वाकण या ठिकाणी डायव्हर्शनमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. मंत्र्यांनी दिलेली अश्वासन फोल ठरल्याची प्रतिक्रिया चाकरमानी देत आहेत.
सरकारकडून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन सुस्थितीत करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे खड्डे मुक्त रस्ता तयार झाला असला तरी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना चाकरमानी गणेशभक्तांचे हाल होत आहेत.