मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai- Goa Highway) 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत म्हणजेच 28 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीला बंदी म्हणजे एक महिना अवजड वाहतुकीवर बंदी असणार आहे. आगामी गणेशोत्सव होईपर्यंत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त महामार्ग करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातली आहे. यामुळे वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा लागणार असल्याची माहिती देखील रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. (हेही वाचा - Wardha: गावात रस्ता नसल्यामुळे कुटुंबीयांना मृतदेह बैलगाडीवरुन नेण्याची आली वेळ, वर्ध्यातील काळजाला चटके देणारा व्हिडिओ)
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता बनविण्याचे काम चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर प्रशासन कामाला लागले असून डिसेंबर 2023 पूर्वी संपूर्ण महामार्ग पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर काम जलद गतीने सुरू असून त्यामुळे जड वाहतूक बंद केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडलं आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने जोरदार तयारी केली आहे. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांनी याच महिन्यात चव्हाण यांनी दोनवेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती.