भारताचे लोह पुरूष अशी ओळख असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या 144 व्या जयंतीचं औचित्य साधत मुंबईमध्ये 'गेटवे ऑफ इंडिया' वरही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडियावर (Gateway of India) आज संध्याकाळी भारताच्या तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मुंबई सह देशभरात 'रन फॉर युनिटी'चं देखील आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जाऊन वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2019: सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून का साजरा केला जातो?
भारताचा सवातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा महत्त्वाच्या दिवशी दक्षिण मुंबईमध्ये सीएसएमटी स्तेशन, बीएमसी कार्यालय सह गेट वे ऑफ इंडिया अशा ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक रोषणाई केली जाते. यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत खास रोषणाई करण्यात आली आहे.
गेट वे ऑफ इंडिया वरील आकर्षक रोषणाई
Mumbai: Gateway of India illuminated in tricolor on the birth anniversary of #SardarVallabhbhaiPatel, today. pic.twitter.com/8weE2xH9X1
— ANI (@ANI) October 31, 2019
दक्षिण मुंबईमध्ये ताज हॉटेलसमोर गेटवे ऑफ इंडिया आहे. नियमित लाखो पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी, बोटिंगचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावत असतात. आजही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.