Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चेंबूर नाका (Chembur Naka) परिसरातील गणेशनगर (Ganesh Nagar)  झोपडपट्टीमध्ये आज (26मार्च) आग भडकली आहे. सिद्धार्थ कॉलनीजवळ संंध्याकाळी 8.30 च्या सुमारास ही आग लागली असून या आगीमध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही. झोपडपट्टीला लागलेल्या आगीचं कारण समजू शकले नसले तरीही आगीत काही सिलेंडर्सचे स्फोट झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हीआग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे.

पहा व्हिडिओ: 

घटनास्थळी चेंबुर पोलिस आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉर्ड ऑफिसर्स आणि रूग्णवाहिका पोहचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आग लागलेला परिसर मोकळा ठेवण्यात आला असून ट्राफिक वळवण्यात आलं आहे.