Fire Broke Out at Kandivali: कांदिवली येथील हंसा हेरिटेज इमारतीला आग, दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त
Fire Broke Out at Kandivali | (Photo Credit- Credit -ANI / Twitter)

मुंबई (Mumbai) येथील कांदिवली (Kandivali) परिसरात असलेल्या हंसा हेरिटेज (Hansa Heritage Building) या निवासी इमारतीला आग लागली आहे. या आगीद दोघा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या मृत्यूबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. दरमयान, कांदिवली पश्चिमेस असलेल्या या इमारतीस लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आल्याचे समजते. ही आग इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागली. आगिचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार, कांदिवली पश्चिम भागात मुथुरादास रोडवर असलेल्या हंसा हेरीटेज या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागली तेव्हा संबंधित इमारतीत सुमारे 7 जण अडकल्याची माहिती होती. दरम्यान, आगीत आडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, दोघांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Mumbai: आग्निशमन दलाच्या ताफ्यात उपलब्ध होणार फायर बाईक; मुंबईतल्या गल्ल्लीबोळातील आग आटोक्यात आणण्यासाठी होणार मदत)

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. मृतांध्ये एक महिला 89 तर दुसरी 45 वर्षांची असल्याचे सांगण्यात येते आहे.