Mumbai Fire: भिंवडी येथील चंदन पार्क परिसरात फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचं नुकसान झाल्याची भीती
Bhiwandi Fire (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या भिंवडी (Bhiwandi)  परिसरात आज (21 ऑगस्ट) फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. चंदन पार्क (Chandan Park) परिसरात असलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार या आगीत लाखो रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

भिंवडी आज सकाळी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या 2 अग्निशमनदलाचे बंब रवाना करण्यात आले आहेत. प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दल या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ANI Tweet

जुलै 2019 मध्ये भिंवडीमध्ये एका गोदामाला अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. केमिकल गोदामाला लागलेली आग मोठ्या मुश्लकिलीने नियंत्रणात आणली होती. यामध्येही सुमारे 12-14 तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आल्याने लाखो रूपयांचे नुकसान होते.