Cyber Slaves | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Cyber-Crime Cases: मुंबईसह देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber-Crime Cases) दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत यावर्षी नऊ महिन्यांत सायबर गुन्ह्यांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले की, या वर्षी सायबर गुन्ह्यांची 4054 प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यापैकी 920 गुन्हे उघडकीस आले असून या प्रकरणांमध्ये 970 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 3191 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचे 11 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. या वर्षी नोंदवलेल्या 2349 ऑनलाइन फसवणूक प्रकरणांपैकी सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक फसवणूक (896), त्यानंतर जॉब फ्रॉड (388), बनावट वेबसाइट फसवणूक (94), ऑनलाइन खरेदी फसवणूक (63), कस्टम/गिफ्ट फ्रॉड (55), कर्ज फसवणूक (45), क्रिप्टो-चलन फसवणूक (35), विमा/ भविष्य निर्वाह निधी फसवणूक (17), वैवाहिक फसवणूक (09) आणि ऑनलाइन प्रवेश फसवणूक (03), असेही होती.

पोलिसांनी 2349 पैकी 214 प्रकरणे शोधून काढली आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 516 जणांना अटक केली आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत, पोलिसांनी 741 क्रेडिट/डेबिट कार्ड ऑनलाइन फसवणूक प्रकरणे नोंदवली आहेत, त्यानंतर अश्लील ईमेल/एसएमएस/एमएमएस/पोस्ट (175), बनावट सोशल मीडिया प्रोफाइल/मॉर्फिंग ईमेल/एसएमएस (108), फिशिंग/एमआयएम. अटॅक/ स्पूफिंग मेल (68), सेक्सटोर्शन (34), हॅकिंग (33), डेटा चोरी (21), पोर्नोग्राफी (14) आणि कम्युनल पोस्ट (05), अशी प्रकरणे नोंदवली गेली. (हेही वाचा: Online Share Trading Scam: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा, महिलेस 1.13 कोटी रुपयांस गंडा; बँक व्यवस्थापकास अटक)

आकडेवारीचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फिशिंग/एमआयएम अटॅक/ स्पूफिंग मेल, जॉब फ्रॉड, गुंतवणूक फसवणूक, पोर्नोग्राफी, हॅकिंग, विमा/ भविष्य निर्वाह निधी फसवणूक, बनावट वेबसाइट, वैवाहिक फसवणूक आणि डेटा चोरी यांसारख्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यासह क्रिप्टो-चलन फसवणूक, कर्ज फसवणूक, अश्लील ईमेल  तसेच एसएमएस/एमएमएस/पोस्ट, फेक सोशल मीडिया प्रोफाइल/मॉर्फिंग ईमेल/एसएमएस, क्रेडिट/डेबिट कार्ड/ऑनलाइन फसवणूक, खरेदी फसवणूक आणि लैंगिक शोषण यासारख्या प्रकरणांमध्ये या वर्षी घट झाली आहे.