Mumbai Customs Video | (Photo Credit - Twitter)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी (Mumbai Customs Video) तीन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल तीन किलो सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारभावातील किंमत प्राथमिक चौकशीनुसार तब्बल 1.40 कोटी रुपये असल्याचे समजते. अटक करण्यात आलेल्या तीनही नागरिकांनी हे सोने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये (Undergarments) लपवले होते. अंतर्वस्त्रात लपवलेले सोने विमानतळाबाहेर नेण्याच्या प्रयत्नात असतानाच तिघांनाही अटक करण्यात आली, अशी माहिती सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओही वृत्तसंस्था एएनआयने ट्विट केला आहे. जो आपण येथे पाहू शकता.

एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, तीन विदेशी नागरिकांच्या अटकेची कारवाई 10 मार्च रोजी करण्यात आली. हे तिनही नागरिक दिस अबाबाहून मुंबई विमानतळावर आले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. या नागरिकांनी आपल्या अंतर्रवस्त्रांमधून आणि पादत्रानांमधून सोने लपवल्याचे आढळून आले. (हेही वाचा, Mumbai Airport Customs: मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने पकडले 4.75 कोटी रुपयांचे सुमारे 9.5 किलो सोने, दोघांना अटक)

ट्विट

सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत सोने जप्त करण्यात आले आणि प्रवाशांना कायद्याच्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.