मुंबई: चर्चगेट स्थानकातील भुयारी मार्गात Escalators लवकरच सुरु होण्याची शक्यता
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मुंबईतील (Mumbai) चर्चगेट (Churchgate) स्थानकातील भुयारी मार्गात लवकरच Escalators (स्वयंचलित जिने) सुरु करणार असल्याचा प्रस्ताव माहापालिकेकडून लवकरच जाहीर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेटवरुन लाखोंच्या संख्येने प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करत असतात.

पश्चिम रेल्वेचे पब्लिक रिलेशन ऑफिसर रविंद्र भाटकर यांनी असे सांगितले आहे की, पादचारी आणि प्रवाशांकडून चर्चगेट येथील भुयारी मार्गात स्वयंचलित जिने सुरु करण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे. त्याचसोबत हे जिने सुरु करण्यात आल्यानंतर भुयारी मार्गातील फेरीवाले दिसणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, चर्चगेट स्थानकाच्या येथे कोणताही पादचारी पूलासह स्वयंचलित जिने नाही आहेत.(Maharashtra Monsoon Session 2019: महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन यंदा पुन्हा मुंबई मध्ये; 17 जूनपासून होणार सुरूवात)

यापूर्वी लोकल जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलचे पत्र रेल्वेतील अभियांत्रिक यांच्याकडे सोपविले होते. परंतु हा मुद्दा महापालिकेचा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिका ही सुविधा सुरु करण्यासाठी वरिष्ठांकडून संमती मिळण्याची वाट पाहत आहेत. तसेच वरिष्ठांकडून या सुविधेला होकार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.