प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) विशेष कोर्टाने एका 13 वर्षाच्या मुलीशी 'सेक्स' विषयी बोलल्याप्रकरणी बस कंडक्टरला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने आरोपी चंद्रकांत सुदाम कोळीला पीओसीएसओ कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर आरोपीला 15 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2018 साली घडली होती. संबंधित मुलगी बसमधून प्रवास करत असताना आरोपी कंटक्टरने तिला "तुला सेक्सबद्दल माहिती आहे का?" अशी विचारणा केली होती. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.

पीडित मुलगी 13 वर्षाची असून ती दररोज बेस्ट बसमधून शाळेत ये-जा करायची. दरम्यान, जुलै 2018 मध्ये पीडित शाळेतून घरी निघाली होती. त्यावेळी बसमध्ये केवळ दोन तीन प्रवासीच होते. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ जाऊन बसला. तसेच थोड्यावेळानंतर तुला सेक्सबद्दल माहिती आहे का? असा प्रश्न विचारला. आरोपीच्या या प्रश्नावर मुलीने माझ्याशी बोलू नका, असे उत्तर दिल्यानंतर आरोपी कोळी उठून गेला. त्यानंतर आरोपी पुन्हा तिच्याजवळ आला आणि सेक्स बद्दल विचारले. दरम्यान, मुलीचा बस स्टॉप आल्यानंतर खाली उरतली. हे देखील वाचा- Pune: लोणावळा येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांकडून घटनास्थळी COVID19 नियमांचे पालन करण्याच्या नागरिकांना सुचना

पीडित मुलगी घरी गेल्यानंतर ती शाळेत जाणार नसल्याचे तिने पालकांना सांगितले. त्यावेळी मुलीच्या आईने तिला कारण विचारले असता तिने उत्तर दिले नाही. यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्या मैत्रिणीला याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडिताची आई तिला बस डेपोमध्ये घेऊन गेली. तिथे मुलीने बस कंडक्टर कोळीला ओळखले. त्यानंतर आईच्या तक्रारीवर कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी कोळीला अटकही केले होते. त्यावेळी आरोपी केवळ 12 दिवस तुरूंगात होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. अपील दाखल करण्यासाठी कोळीच्या वकिलांनी शिक्षा स्थगितीसाठी अर्ज दाखल केला आहे. हे मान्य करून कोर्टाने ही शिक्षा 30 दिवसांसाठी तहकूब केली आहे.