Bird Flu Outbreak (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या (Mumbai) लगतच्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची (Bird Flu) प्रकरणे समोर आल्यानंतर बीएमसी (BMC) सतर्क झाली आहे. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि चिकन दुकानांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत बर्ड फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बीएमसीने (BMC) हा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्रातील विरार (Virar) आणि शहापूरमध्ये (Sahapur) बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर प्रशासनाने शेकडो कोंबड्या ठार करून पुरल्या. हे भाग मुंबईपासून फार दूर नाहीत, त्यामुळे बीएमसीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चिकन आणि अंड्याच्या दुकानांवर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आरोग्य विभागाच्या पथकानेही काही भागात जाऊन नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल काही दिवसांत येण्याची शक्यता आहे.

शेकडो कोंबड्या मारून पुरल्या

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक, ठाण्यातील शहापूर परिसरात बर्ड फ्लूची पहिली लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर स्थानिक प्रशासनाने शेकडो कोंबड्यांना ठार मारलेच नाही, तर अंडीही जप्त केली. शहापूरनंतर विरारच्या अर्नाळा आणि बेरार भागात बर्ड फ्लूची लक्षणे आढळून 2300 कोंबड्या मारून पुरल्या गेल्या. बर्ड फ्लूचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुनील केदार म्हणाले की, ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (हे ही वाचा Worli Fire Incident: शिवसेनेने वरळीच्या आगीत वाचलेल्या 6 वर्षाच्या मुलाला घेतले दत्तक, 15 लाखांची केली आर्थिक मदत)

सध्या मुंबईत बर्ड फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र जवळपासच्या भागात रुग्ण आढळल्यानंतर बीएमसीने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर काही जिल्ह्यांमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारची चिंता वाढली आहे.