भिवंडी: इमारतीचा स्लॅब कोसळून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भिवंडी (Bhiwandi) येथील पद्मानगर मधील एका इमारतीच्या खोलीतील स्लॅब कोसळल्याने घरात झोपलेल्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच मुलीची आई आणि अजून एक मुलगी या मध्ये जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गंगाजमुना असे इमारतीचे नाव असून त्याला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या एका खोलीत मुलीची आई आणि तिच्या बहिणीसह रात्री झोपले होते. तर नवरा घराबाहेर मित्रांसोबत गप्पा मारत होता. परंतु त्यावेळी अचानक घराचा स्लॅब झोपलेल्या 11 वर्षीय मुलीच्या डोक्यात आणि छातीवर पडला. (पुणे: उधारीच्या पैशांवरुन वाद झाल्याने तरुणाला दगडाने ठेचून मारले)

या दुर्घटनेत अल्पवयीन मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई आणि बहिण या दोघी जखमी झाल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्ष आणि अग्निशमनल दलाला या बद्दल तीन तासांनतर घटनेची माहिती मिळाली.