भांडुप येथील घराच्या बाथरुम मध्ये शिरला 7 फूट अजगर, घरातील मंडळींची उडाली घाबरगुंडी
Rock Python (Photo Credits-Facebook)

मुंबईतील भांडुप (Bhandup) येथील विनय ढोबळे यांच्या घराच्या बाथरुममध्ये मध्यरात्री 7 फूट अजगर शिरल्याची घटना घडली आहे. यामुळे ढोबळे कुटुंबाची झोपच उडाली. 7 फूट अजगर हा प्रचंड महाकाय आणि भयानकर होता की, संडासाच्या पाईपलाईन मधून तो घरात शिरला असल्याची माहिती देण्यात येत आहे.

ढोबळे यांनी मध्यरात्री 2 वाजता ही घटना घडली असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत बाथरुमचा दरवाजा लावून घेत बायको मुलांसह राहत असलेल्या महापालिकेच्या घरातून त्यांनी पळ काढला. तसेच आजूबाजूच्यांना मध्यरात्री जागे करत या प्रकरणाची माहिती दिली. या महापालिकेच्या रहिवाशी कॉलनीत अक्षय पाटकर नावाच्या तरुणाने स्वयंसेवी संस्थेला फोन करुन या बद्दल अधिक माहिती दिली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थेमधील अधिकाऱ्यांनी येऊन जवळजवळ 45 मिनीटे शर्थीचे प्रयत्न करुन त्या अजगराला संडासातून बाहेर काढले. ढोबले यांना लहान मुले सुद्धा आहेत. या घडलेल्या प्रकारामुळे ही दोन मुले सुद्धा अत्यंत घाबरलेली होती.(हेही वाचा-मांडुळ सापांची तस्करी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यासह अन्य एका आरोपीला पालघर येथून अटक)

त्यानंतर अजगराचे सुटका करण्यात आल्यानंतर त्याला वाईल्ड लाईफ वेल्फेअर मधील अमन सिंग यांच्याकडे देण्यात आले. तसेच ढोबळे यांच्या घरातील अजगरची सुटका करण्यात आल्यानंतर काही वेळानंतर तेथील एका रस्त्यावर सुद्धा मोठा अजगर दिसून आला. तर रॉक अजगर बिनविषारी अजगर असून बहुधा जंगली क्षेत्र आणि वाळवंटाच्या ठिकाणी आढळून येतो. परंतु जास्तकरुन पाणथळ ठिकाणी हा अजगर दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.