मुंबई: बेस्ट कर्मचारी 9 ऑक्टोबरला संप पुकारण्याच्या तयारीत; वेतनवाढी सह अन्य मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक
BEST Bus (Photo credits: PTI)

मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळात बेस्ट कर्मचार्‍यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता पुन्हा आक्रमक होत वेतनवाढीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन पुन्हा संपाच्या तयारीत आहे. आज मुंबईमध्ये विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने 9 ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बेस्ट महाव्यवस्थापनाला आज एका नोटीशीच्या माध्यमातून आगामी संपाची माहिती दिली आहे.

महाव्यवस्थापकाला पाठवलेल्या संपाच्या नोटिशीत दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्‍यांनी, बेस्ट वर्कर्स युनियनने 16 मे 2016 ला सादर केलेले मागणीपत्र व 6 ऑगस्ट 2019 रोजी सादर केलेले पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करार करण्याबाबत सूचना केल्या होत्या. जोपर्यंत हा करार होत नाही, तोपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांची मासिक अंतरिम वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास आम्हाला कोणताही संप करायचा नाही. परंतु, व्यवस्थापक आमच्यापासून दूर गेल्याने आमच्या समोर पर्याय नसल्याचे देखील शशांक राव यांनी सांगितले आहे. नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर 'बेस्ट कामगारां'च्या बेमुदत उपोषणाला स्थगिती; गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलन सुरु

वेतनवाढ, सातवा वेतन आयोग लागू करा, बेस्टचा 2016 पासून रखडलेला वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत