जुलै महिना हा मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक ठरला. या महिन्याच्या सुरुवातीला बेस्टचे (Best) किमान भाडे 5 रुपये नव्या सरकारने मुंबईकरांना खूश केले. सरकारच्या निर्णयाने मुंबईकरांनी सरकारला डोक्यावर घेतले खरे मात्र बेस्ट कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बेस्ट कर्मचारी मात्र हताश झाले. त्यामुळेच येत्या 6 ऑगस्ट पासून बेस्ट कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे पत्रक देखील त्यांनी प्रशासनला दिले आहे.
बेस्ट युनियनने 16 मे 2016 रोजी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचे सांगत हा संप करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.
हेही वाचा- मुंबईकरांसाठी खुशखबर! आधी बसचे तिकिट दर कमी आणि आता 400 एसी बस ची भर
मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणीही झाली, परंतु मध्यस्थीनंतर पुन्हा ही मुंबई उच्च न्यायालयात असफल अहवाल दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कारणास्तव चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या सरकारने आधी मान्य कराव्या अन्यथा संप सुरुच राहिल असेही बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.