सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 75 वर्षीय वृद्धाला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) एका 75 वर्षीय वृद्धाने अवघ्या 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुवारी कोर्टाने पोक्सो अॅक्ट अंतर्गत या वृद्धाला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

2016 रोजी एप्रिल महिन्यात या वृद्धाने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीला घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. तर पीडित मुलीला रडताना पाहताल्यास तिच्या आईने रडत असल्याचे कारण विचारले. तेव्हा मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.(हेही वाचा-जळगाव येथील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निराधार महिलेकडे शरीरसुखाची मागणी)

तर घरातील मंडळींनी तातडीने पोलिसात धाव घेत मुलीची साक्ष देत वृद्धावर गुन्हा दाखल केला. तसेच मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे पुरावे देखील तपासणीनंतर स्पष्ट झाले. तर आरोपीला अटक केल्यापासून तुरुंगात राहत असून त्याच्या जामिनासाठी कोर्टाने नकार दिला आहे.