मुंबई मध्ये वांद्रे (Bandra) परिसरात 25 वर्षाच्या व्यक्तीने त्याच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना लॉकडाऊनचे नियम मोडल्याने पोलिसांनी त्याला अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान मुंबई मिररच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव हरिस खान (Haris Khan) असून तो वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहे. दरम्यान 30 मित्रांसोबत 25 वा वाढदिवस साजरा करताना केक तलवार आणि चॉपरने कापत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मीडीया रिपोर्ट नुसार, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री हरिसने त्याच्या मित्रांना बर्थ डे पार्टीसाठी बोलावले होते. त्याच्या इमारतीच्या टेरेसवर बर्थ डे पार्टीचं आयोजन होतं. दरम्यान या सेलिब्रेशनचा व्हिडिओ उपस्थितांपैकी एकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. या बर्थ डे सेलिब्रेशन ना कोणी मास्क घातला होता ना कोणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिसाब कडे परवाना नसलेली तलवार होती.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख आणि बिनू वर्गिस यांनी ट्वीटरवर मुंबई पोलिसांना ट्विट करत व्हिडिओ पाठवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिस स्थानकामध्ये पोलिस तक्रार देखील दाखल झाली आहे. सोमवार (20 जुलै) दिवशी वांद्रे पोलिसांनी घरी जाऊन हिसाबला अटक केली त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करण्यात आले होते. सध्या हिसाब खानला पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.
ANI Tweet
Maharashtra: A 25-year-old man has been booked and arrested for celebrating his birthday which was in violation of lockdown norms in Bandra, Mumbai.
— ANI (@ANI) July 21, 2020
सध्या कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करण्यासोबत त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगण्याचा आरोप देखील आहे. दरम्यान त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्याच्याकडून सध्या शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
हिसाब खानच्या बर्थडे पार्टीमध्ये सहभागी लोकांचादेखील तपास सुरू असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.