Accident (PC - Pixabay)

Mulund Hit And Run: राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम सुरू आहे. ठिकठिकाणी भाविक आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करत असतानाचा असतानाच मुलूंडमध्ये अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंडमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. तेथे हिट-अँड-रन (Mumbai Hit-and-Run) ची घटना घडली. एका बीएमडबल्यू कारने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. दोघेही रस्त्यावर गणपतीचे बॅनर लावत होते. (हेही वाचा:Mumbai Hit And Run: मुंबई येथील वरळी परिसरात 'हिट अँड रन'; एक ठार, दुसरा जखमी; वाहनचालक फरार )

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रितम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. याचवेळी अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असतांना यादोघांना जोरदार धडक दिली. पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या धडकेत प्रितम थोरात याचा मृत्यू झाला असून दुसरा प्रसाद पाटील याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा: Mumbai Hit-and-Run: गोरेगाव येथे वेगवान कारने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघांना अटक, एक आरोपी अल्पवयीन)

मुलुंडमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं 

धडक देऊन कार चालक थांबला देखील नाही, तो मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. अपघाताची माहिती तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सध्या कार आणि फरार चालकाचा शोध घेत आहेत.