महाराष्ट्र राज्य परिवहन (Maharashtra State Road Transport Corporation) म्हणजेच एस टी कर्मचार्यांसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी 180 दिवसांच्या बालसंगोपन रजेची (child care leave) घोषणा करून नववर्षाची भेट दिली आहे. महिला कर्मचार्यांसोबतच, पत्नी नसलेल्या पुरूषांनाही बालसंगोपन रजेचा फायदा मिळणार असल्याने आता एसटी कर्मचार्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कशी असेल एसटी कर्मचार्यांसाठी बालसंगोपन रजा ?
- बालसंगोपन रजा 180 दिवसांची असून किमान एका वर्षामध्ये सर्वाधिक 2 महिन्याची रजा कर्मचार्यांना मिळू शकते.
- बालसंगोपन रजेचा फायदा फक्त पहिल्या 2 मुलांसाठी मिळू शकतो.
- मुलं 18 वर्षांची होईपर्यंत बालसंगोपन रजेचा फायदा मिळू शकतो.
स्त्री आणि पुरूष कर्मचार्यांनाही मिळणार फायदा
बालसंगोपन रजा ही पुरूष आणि स्त्री कर्मचार्यांनाही मिळणार आहे. एसटीमध्ये काम करत असलेल्या पुरूष कर्मचार्याची पत्नी एखाद्या असाध्य आजाराने पीडित असल्यास त्यांनाही या रजेचा फायदा मिळणार आहे. महिला कर्मचार्यांना नऊ महिन्यांची प्रसुती काळातील रजा एसटीने काही दिवसांपूर्वीच मंजूर केली आहे. आता त्यासोबतच ही बालसंगोपन रजा देण्यात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पुरूष कर्मचार्यांसाठीदेखील 180 दिवसांची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात आली आहे.