MSCE Pune Scholarship Result 2021: 5वी, 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर; mscepune.in वर असे पहा गुण
निकाल। File image

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून MSCE Pune Scholarship Result 2021 जाहीर करण्यात आला आहे. काल (24 नोव्हेंबर ) दिवशी दुपारी 2.30 च्या सुमारास 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अंतरिम निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. MSCE चे अधिकृत संकेतस्थळ mscepune.in आणि mscepuppss.in वर विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

कोविड 19 संकटाचा फटका यंदा शिष्यवृत्ती परिक्षेला देखील बसला आहे. ऑफलाईन राज्यात परीक्षा घेण्यासाठी अनेकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. परंतू 12 ऑगस्टला राज्यात ही परीक्षा पार पडली. 47612 शाळांमधून 6.32 लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले होते. एकूण अर्जांपैकी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 388335 विद्यार्थी होते तर 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 244143 विद्यार्थी होते.

कसा पहाल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

  • mscepune.in and mscepuppss.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर उजव्या बाजूला दिलेल्या ‘Interim Results for student’s link’वर क्लिक करा.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा 11 अंकी सीट नंबर विचारला जाईल.
  • तो सीट नंबर टाकल्यानंतर निकाल पाहता येईल.
  • निकालाची प्रत डाऊनलोड करून प्रिंट आऊट देखील काढता येऊ शकते.

    शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी या डिरेक्ट लिंक वर देखील तुम्ही क्लिक करू शकता.

    दरम्यान विद्यार्थ्यांचा हा अंतरिम निकाल आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आक्षेप नोंदवायचा असल्यास त्यांना 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यासाठी 50 रूपये अ‍ॅप्लिकेशन फी आकारली जाईल. त्यानंतर मार्क्स व्हेरिफिकेशन करून दिले जाईल. ऑनलाईन व्यतिरिक्त किंवा डेडलाईन नंतर केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. दरम्यान स्कॉलरशीप निकाल 2021 बद्दलचे अधिक तपशील वेळोवेळी जाणून घेण्यासाठी MSCE Pune च्या वेबसाईटला भेट देत रहा.