Monsoon in Mumbai: मान्सून मुंबईत उद्या दाखल होण्याची शक्यता! अनेक ठिकाणी 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद
Monsoon in Mumbai | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)

केरळमार्गे भारतात आणि कोकण मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता अधिक वेगाने पुढे पुढे सरकतो आहे. आता तो पुण्यापर्यंत पोहोचला असून उद्या (बुधवार, 9 जुलै 2021) मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसह रायगड, नवी मुंबई, पुणे ठाणे आदी ठिकाणीही पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईतील काही ठिकाणी आज (मंगळवार, 8 जुलै) 100 मीमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईत मान्सून (Monsoon in Mumbai) उद्यापर्यंत दाखल होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे हवामान विभागाचे एसआडी के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.

के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना म्हटले आहे की, ''मुंबईमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक ठिकामी मुसळधार (100 मीमी पेक्षा अधिक) पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. उद्या (बुधवार, 9 जुलै) मुंबईमध्ये मानसूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. पावसाच्या नोंदी, व पश्चिम दिशेचे वारे व इतर घटक मान्सून आगमन होण्यासाठी पूरक आहेत.'' यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा काही काळ लवकर झाले आहे. त्यामुळे राज्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. (हेही वचाा, Dangerous Buildings: पावसाळयाआधी मुंबईमधील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी जाहीर; MHADA ने केले सर्वेक्षण (See List))

के एस होसाळीकर ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने आज दमदार हजेरी लावली. यात मुंबईतील काही भाग तसेच नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी तूरळक, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

के एस होसाळीकर ट्विट

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापलिका सतर्क झाली आहे. अनेक ठिकाणी नालेसफाईचे काम महापालिकेने केले आहे. याशिवाय मुंबईतील जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्तेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हाडाने (MHADA) आज मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यात 21 इमारतींचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, धोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी/ भाडेकरु आहेत.