Maharashtra Monsoon 2020 Update: मराठवाड्यात जोरदार पाऊस तर मुंबईत पुढील 2 दिवस हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईत 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यानंतर हळूहळू मान्सूनने राज्य व्यापले. परंतु, दमदार पावसाची संपूर्ण राज्य वाट पाहत आहे. राज्यात आणि मुंबईत देखील हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. दरम्यान राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. तर मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलक्या मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आयएमडी जीएफएस मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत काल वर्सोवा, अंधेरी भागात जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असून अधूनमधून सरी बरसतील असा अंदाज आहे. (Maharashtra Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात 28 जून पासून मान्सून साठी अनुकूल हवामानाचे अंदाज, राज्यातील पावसाची आतापर्यंतची टक्केवारी जाणून घ्या)

के. एस. होसाळीकर ट्विट:

दरम्यान भारतात यावर्षी समाधानकारक पाऊस होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनासह सामान्यांसाठी देखील ही माहिती अतिशय दिलासादायक आहे.