Money Double Scam in Mumbai: मुंबईत ५ जणांच्या एका टोळक्याने काळ्या जादूचा वापरातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष (Double money scheme)दाखवत एका 35 वर्षीय व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे कांदिवली पूर्व येथे किराणा दुकान आहे. कथित घटना 18 डिसेंबर रोजी घडली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. (Viral Video: पेट्रोल पंपावर गुंडांची दादागिरी! पेट्रोल पंप चालक महिलेला गुंडांनी पडायला लावले पाय)
काळ्या जादूचा वापर करून पैसे दुप्पट करण्याची शक्कल
मिड-डेच्या वृत्तानुसार, तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुरुवातीला त्याच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने त्याच्याशी संपर्क साधला. पीडितेशी संभाषण करत असताना, ग्राहकाने दुकान मालकाशी ओळख करून घेतली. काळ्या जादूचा वापर करून पैसे दुप्पट करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीने त्याला सांगितले. सत्यता तपासण्यासाठी दुकानदाराने प्रात्यक्षिक करण्यास सांगितले. ग्राहकाने त्याला होकार दर्शवला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये दुकानदाराला गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये नेण्यात आले.
प्रसादत मादक द्रव्य मिसळले
तेथे पाच जण उपस्थित होते. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका आरोपीने दुकानदाराला पुस्तकात १०० रुपये ठेवण्यास सांगितले आणि शांतपणे बसण्यास सांगितले. यानंतर, आरोपींनी एक विधी करत असल्याचे भासवले. ज्यामध्ये "पूजा", मंत्रांचे वाचण झाले. त्यानंतर पुस्तकात त्यांनी २०० रुपये ठेवले. अशा प्रकारे पुस्तकात ठेवलेले पैसे दुप्पट झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुकानदाराला हे सर्व सत्य असल्याचे पटले. झटपट पैसे कमवण्याकडे दुकानदाराचा कल गेला. आमिषाला बळी पडून दुकानदाराने ५० लाख रुपयांची व्यवस्था केली आणि पैसे दुप्पट करण्यासाठी आरोपीला दिले. आरोपीने यावेळी मात्र, दुकानदाराला पूजेच्या आधी मोबाईल बंद करण्यास सांगितला. त्यावर पैसे दुप्पट करण्यासाठी विशेष पूजा करण्यास सुरूवात केली. विधी पार पाडत असताना, आरोपींनी दुकानदाराला "प्रसाद" दिला. ज्यात मादक द्रव्य घातले होते. प्रसादाचे सेवन करताच दुकानदार बेशुद्ध पडला.
दुकानदाराला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली
त्यानंतर आरोपींनी संधी साधून पैसे घेऊन पळ काढला. दुसऱ्या दिवशी, जेव्हा दुकानदाराला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली. तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्याने सगळी घटना पोलिसांसमोर कथन केली. पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.