ताडोबा जंगल सफारी (Photo Credit : Facebook)

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Jungle Safari) आता पर्यटकांना मोबाईलमध्ये वाघाचे फोटोज किंवा व्हिडिओज घेता येणार नाही. हा नियम पर्यटकांना निराश करणारा असला तरी प्राणी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 1 डिसेंबपासून ताबोडात मोबाईलवर बंदी टाकण्यात आली आहे. मोबाईलचा त्रास वन्य प्राण्यांना होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेकदा उत्साहापोटी पर्यटक, गाईड किंवा वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. या गोष्टी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून 1 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

काय आहे निर्णय?

सर्व पर्यटक, वाहनचालक आणि गाईड यांना सफरीच्या वेळी व्याघ्रप्रकल्पात मोबाईल नेता येणार नाही. 1 डिसेंबर 2018 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियामाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ प्रकल्पाबाहेर काढण्यात येईल. तर मार्गदर्शक, जिप्सी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

उत्साहाच्या भरात होणाऱ्या चुका-

-सफारीदरम्यान वाघ किंवा इतर वन्य प्राणी दिसल्यास पर्यटक, गाईड किंवा वाहनचालक एकमेकांना मोबाईवरुन सुचित करतात. त्यामुळे वाहनचालक गाडीचा वेग वाढवतात आणि त्या ठिकाणी पोहचतात. यामुळे पर्यटक, चालक किंवा वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तसंच एकाच जागी पर्यटकांची गर्दी झाल्याने प्राणीही बिथरु शकतात.

-काही पर्यटकांना सेल्फीचा उत्साह आवरता न आल्याने ते वाघांसोबत सेल्फी काढतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.

-काही पर्यटक वन्यप्राण्यांचे फोटो जिओ टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचे ठिकाण तपशीलासह इतरांना कळते.

तर सुट्ट्यांध्ये ताडोबा जंगल सफारीला जाण्याचा विचार करत असाल तर हा नियम नक्की लक्षात ठेवा.