Thackeray Reunion | X@SandeepDeshpancde

महाराष्ट्रात राजकीय पटलावर पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. 20 वर्षांनंतर 5 जुलै दिवशी  राजकीय व्यासपीठावर पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूंची ही भेट अनेक मराठी जनसामान्यांना  सुखावणारी होती. सध्या सोशल मीडीयात या बंधूभेटीची चर्चा सुरू असताना सत्ताधार्‍यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणं हे  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची टीप्पणी केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना आज ठाकरे गट आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये 'मग तुम्ही ?'  या कॅप्शन सह एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात ठाकरे बंधूंच्या फोटोवर सत्तेसाठी असं लिहलं आहे तर त्या खाली महायुती मधील काही नेत्यांचा एकत्र फोटो आहे ज्यावर 'मग हे...? असं लिहलं आहे.

संदीप देशपांडे यांची X  पोस्ट

युवासेना

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

वरळीच्या NSCI डोम मध्ये काल, 5 जुलै दिवशी आवाज मराठीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार कडून राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्री अंमलबजावणीला ठाकरे बंधूंनी एकत्र विरोध करत हिंदी सक्ती विरूद्ध आवाज उठवला होता. 5 जुलैला या हिंदीसक्ती विरूद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र सरकारने सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले. व्यासपीठावर केवळ ठाकरे बंंधू होते. त्यांनी केलेल्या भाषणातून राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र यामध्ये तडजोड केली जाणार नाही असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान ठाकरे बंधू भेट आणि आवाज मराठीचा विजयी मेळाव्यावर महायुती कडून मात्र टीका होताना दिसत आहे.