'उद्धवा अजब रे तुझे सरकार' मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेला टोला
Sandeep Deshpande (Photo Credits: Facebook)

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात येत्या 26 जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. यामुळे तब्बल 88 वर्षानंतर शहरात मुंबई पोलीस घोड्यांवरून पेट्रोलिंग करताना पाहायला मिळणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)नेते संदीप देशापांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर (ShivSena) निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हटले की, जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेले. आमचे पोलीस दल चंद्रयानाकडून घोड्यावर आले. उद्धवा अजब रे तुझे सरकर, असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सराकारच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे.

उद्या 23 जानेवारी रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन होणार असून यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या भूमिकेत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करुन मनसेने विरोधाकांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मराठी भाषेचा मुद्दा मांडणारी मनसे सरकार अधिक यश मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचे धोरण आणि नवी वाटचाल अधिवेशनात ठरवली जाणार आहे. हे देखील वाचा-Mumbai Mounted Police Unit: मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या नव्या अश्वदल युनिफॉर्मचे मुंबई पोलिसांनी मानले आभार; इथे पहा गणवेशाची खास झलक

संदीप देशापांडे यांचे ट्विट-

खरे तर ब्रिटीश काळात मुंबई पोलिस दलात अश्वदल कार्यरत होतं. मात्र 1932 मध्ये ते बंद करण्यात आले. आता 88 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे युनिट सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून हे अश्वदल पोलीस दलात असेल अशी माहिती मिळत आहे. आत्तापर्यंत सरकारने 13 घोडे खरेदी केले असून येत्या 26 जानेवारीला शिवाजी पार्कच्या पथसंचलनात 11 घोडेस्वार पोलीस सहभाही होणार आहे.