Amit Thackeray - Mitali Borude Wedding :  अमित ठाकरे 27 जानेवारीला अडकणार विवाहबंधनात
Amit Thackeray Wedding Date (Photo Credits : Instagram)

Amit Thackeray - Mitali Borude Wedding : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray)  27 जानेवारी 2019 रोजी त्याची मैत्रिण मिताली बोरूडे (Mitali Borude)  सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लोअर परेल भागातील सेंट रेजिस (The St. Regis Lower Parel) या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ABP Majha ने दिलेल्या वृत्तानुसार नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरेंनी सप्तशृंगीच्या चरणी अमित-मितालीच्या लग्नाची पत्रिका ठेवण्यात आली आहे.

अमित आणि मिताली हे दोघंही एकमेकांना अनेक वर्ष ओळखत आहे. मिताली बोरूडे  ही प्रसिद्ध बॅरिएटिक सर्जन संजय बोरूडे यांची कन्या आहे. कॉलेज दिवसापासूनच ते एकमेकांना ओळखत होते. राज ठाकरेंची होणारी सून Mitali Borude नेमकी कोण ?

 

View this post on Instagram

 

New boss in the house ❤ . .#Officialpost

A post shared by Amit Thackeray (@amit.thackeray) on

अमित आणि मिताली बोरूडे साखरपूडा 11 डिसेंबर 2017 रोजी पार पडला होता. या दिवशी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस होता. मिताली ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते. अमितची बहीण उर्वशीसोबत 'द रॅक' या ब्रॅन्डखाली दोन्ही एकत्र ड्रेस डिझाईन करतात.