केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) 15 एप्रिलला मुंबईत (Mumbai) येणार आहेत. शहा यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. आदेशात, मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, ‘असे अहवाल प्राप्त झाले आहेत की, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात, 15 एप्रिल आणि 16 एप्रिल 2023 रोजी भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुंबई भेटीदरम्यान, दहशतवादी/समाजविरोधी घटक ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात.’
‘यामुळे शांततेचा भंग होण्याची आणि सार्वजनिक सौख्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचाही गंभीर धोका आहे.’
आदेशात पुढे म्हटले आहे की, ’येत्या 15 आणि 16 एप्रिल रोजी भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने व्हीआयपी आणि विविध अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवून तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून दहशतवादी/असामाजिक घटक ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट किंवा कोणत्याही प्रकारचे फुगे किंवा पतंग यांच्याद्वारे हल्ला करू शकणार नाहीत.‘
आदेशात म्हटले आहे की. ‘15 आणि 16 एप्रिल रोजी भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ पोलीस ठाणे, सहार पोलीस ठाणे, कुलाबा पोलीस ठाणे, विलेपार्ले पोलीस ठाणे, खेरवाडी पोलीस ठाणे, वाकोला पोलीस ठाणे, वांद्रे पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाणे, गमदेवी पोलीस ठाणे, डी.बी. मार्ग पोलीस स्टेशन, मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन, कफ परेड पोलीस स्टेशन आणि मलबार हिल पोलीस स्टेशन हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट विमान उडवण्याच्या क्रियाकलापांना परवानगी दिली जाणार नाही.’ (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीचे राजकारण थांबवावे, नाना पटोलेंचे आवाहन)
अशा गोष्टी रोखण्यासाठी तत्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचेही आदेशात म्हटले आहे. विशाल ठाकूर, पोलीस उपायुक्त, (ऑपरेशन्स), मुंबई यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता आणि 15 एप्रिलच्या 00.01 वाजल्यापासून 16 एप्रिलच्या 24.00 वाजेपर्यंत लागू राहील.