Asaduddin Owaisi Statement: एमआयएम भारतात होणाऱ्या सर्व निवडणूका लढणार, अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य
असदुद्दीन औवेसी (Photo Credits-ANI)

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व निवडणुका (Elections) लढवणार आहे. औरंगाबाद, महाराष्ट्रामध्ये, आमचा पक्ष येथे सर्व निवडणुका लढवेल आणि गरज पडल्यास इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याचा पर्याय खुला ठेवेल, असे AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी सांगितले आहे. औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या ओवेसी यांनी चीन आणि काश्मीरच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली आणि या प्रश्नांना सामोरे जाण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असे सांगितले.

ओवेसी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर चीन आणि काश्मीर प्रश्नांची अयोग्य हाताळणी असल्याचा दावाही केला. चीन तुमच्या जमिनीवर आहे पण सरकारने नकार दिला. जर तुमच्या जमिनीवर कोणीच धरून नाही, तर मग या दोन्ही पक्षात चर्चेच्या फेऱ्या कशासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे. भाजपने खासदारांची एक टीम लडाखला घेऊन दाखवावी. तेव्हा ग्राउंड रिअॅलिटी कळेल. पण भाजप आणि आरएसएस या मुद्द्यावर शांत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 च्या तरतुदी काढून टाकण्यासारख्या हालचालींनी अशांत प्रदेशातील जमिनीवरची परिस्थिती बदलण्यासाठी काहीही केले नाही. कारण दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवान आणि नागरिक मारले जात आहेत, असेही ते म्हणाले. हेही वाचा PM Modi-Pope Francis Meet: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोपशी भेट; जाणून घ्या पीएम नरेंद्र मोदी व पोप फ्रान्सिसमध्ये काय झाली चर्चा

भाजपच्या विरोधात राष्ट्रीय आघाडीच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ओवेसी म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल आता काही सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. मला कल्पना नाही की त्याचा चेहरा कोण असेल. मी उत्तर प्रदेश निवडणुकीबद्दलही काही सांगू शकत नाही. आदर्श संहिता येऊ द्या, मग मी बोलेन, असे ते पुढे म्हणाले.